Ad will apear here
Next
राष्ट्रीय आयोगाच्या तज्ञ समिती सदस्यपदी प्रा. विनायक लष्कर
प्रा. विनायक लष्करबारामती (पुणे) : प्रा. विनायक सुभाष लष्कर यांची राष्ट्रीय विमुक्त, भटक्या आणि निम्नभटक्या जाती-जमाती आयोगाच्या तज्ज्ञ समिती सदस्यपदी (कार्यगट) नियुक्ती करण्यात आली आहे. या आयोगात एकूण आठ कार्यगट असून, प्रा.लष्कर हे त्यापैकी तीन गटांचे सक्रिय सदस्य आहेत. या कार्यगटांमध्ये भटक्या-विमुक्त जमातीमधील स्त्रियांचे प्रश्न, या जमाती संदर्भात केंद्र व राज्य पातळीवर अस्तित्वात असणाऱ्या योजनांचा अभ्यास आणि भटक्या-विमुक्तांचे शिक्षण अशा महत्वाच्या विषयांचा समावेश आहे.

प्रा. विनायक लष्कर ‘अनेकांत एज्युकेशन सोसायटी’च्या तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातील समाजशास्त्र विभागाचे प्रमुख आहेत. त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून समाजशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. सध्या ते याच विषयात पीएच. डी. करत आहेत. त्यांनी या विषयामध्ये राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व युनिव्हर्सिटी ऑफ मॅसेच्युसेट्स ऍमहर्स्ट, युएसए यांच्या उच्च शिक्षणावर आधारित संयुक्त संशोधन प्रकल्पात त्यांनी काम केले आहे. प्रा. लष्कर भटक्या-विमुक्त जाती-जमातीच्या प्रश्नांवर गेली पंधरा वर्षे काम करत आहेत. या विषयांसंदर्भात त्यांनी विविध नियतकालिके, मासिके आणि पुस्तकांमध्ये सातत्याने लिखाण केले आहे. 

प्रा. लष्कर यांच्या नियुक्ती बद्दल अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अरहतदास शाह सराफ, सचिव जवाहर शहा वाघोलीकर, संस्थेचे सर्व पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रशेखर मुरुमकर आणि सर्व प्राध्यापक, विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/OYYRBF
Similar Posts
‘शिक्षणातील बदलते प्रवाह जाणून घेणे गरजेचे’ बारामती : ‘पारंपरिक शिक्षणासोबतच कौशल्यपूर्ण अभ्यासक्रमांची या शैक्षणिक युगात निकड भासत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या पिढीतील तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शिक्षण देणे हे आजच्या शिक्षकाचे कर्तव्य आहे. हा बदल करण्यासाठी प्राध्यापकांनी शिक्षण क्षेत्रात बदलत असलेले प्रवाह जाणून घेणे गरजेचे आहे,’ असे मत पुणे विभागाचे उच्च शिक्षण सह संचालक डॉ
व्यक्तिस्वातंत्र्य हा मूलभूत हक्क : डॉ. रझिया पटेल बारामती (पुणे) : 'स्त्री आणि पुरुष ही मानवी व्यक्तिमत्वाचे दोन अविभाज्य भाग आहेत. ते दोन्ही समसमान आहेत याची जाणीव आजच्या युगातल्या युवकांना असणे आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्तीचे स्वातंत्र्य हा त्याचा मूलभूत हक्क आहे,' असे मत जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. रझिया पटेल यांनी व्यक्त केले. तुळजाराम चतुरचंद
बारामती येथे आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात पुणे : आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त बारामती येथे तालुका प्रशासन, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तसेच म. ए. सोसायटीचे कै. गजाननराव भिवराव देशपांडे विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने योगदिनाचा कार्यक्रम म. ए. सोसायटीच्या मैदानावर घेण्यात आला.
इंदापूर व दिव्यातील शासकीय निवासी शाळेत मोफत प्रवेश बारामती : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची दिवे येथील (ता. पुरंदर) शासकीय निवासी शाळा, तसेच तरंगवाडी (ता. इंदापूर) येथील शासकीय निवासी शाळा येथे सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षातील मोफत प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language